Maharashtra: नक्षलग्रस्त गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मोबाईल सायन्स लॅब सुरू, पहा व्हिडिओ

हा प्रकल्प सध्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली आणि भामरागड ब्लॉकमध्ये काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील 16 आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फिरता विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात फिरती विज्ञान प्रयोगशाळा एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान घेता येईल. हा प्रकल्प सध्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली आणि भामरागड ब्लॉकमध्ये काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. विद्यार्थी गळतीचा सर्वाधिक फटका या ब्लॉकला बसला आहे. फिरती विज्ञान प्रयोगशाळा पूर्वनिश्चित मार्गावर 16 आश्रम शाळांना भेट देईल. हेही वाचा Mumbai Police Bharti: मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादी जारी; आक्षेप नोंदवण्यासाठी 24 तासांची मुदत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)