MNS Gudhi Padwa Sabha Teaser: मनसेचा गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च; 9 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार
मनसेचा गुढी पडवा मेळावा 9 तारखेला संध्याकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निमित्ताने राज ठाकरे शक्तीप्रदर्शनही करणार हे निश्चित आहे.
MNS Gudhi Padwa Sabha Teaser: मनसेने गुढी पाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. नुकताच पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च (MNS Gudhi Padwa Sabha Teaser) करण्यात आला आहे. त्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे भाषण करतानाचे व्हिज्युअल्स, श्रोत्यांची गर्दी दाखवण्यात आली आहे. राजकारणाची झाली दशा, राजविचार दाखवणार महाराष्ट्राला दिशा, असं या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज असल्याचंही या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब ठाकरे यांचा विजय असो या घोषणाही या टीझरमध्ये ऐकायला येत आहेत. (हेही वाचा :MNS In Mahayuti? : Raj Thackeray मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला (Watch Video) )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement