MNS Thane Rally: करारा जवाब मिलेगा म्हणत मनसे कडून ठाण्यात होणार्‍या 'उत्तरसभे'चा टीझर जारी

12 एप्रिल दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात सभेला संबोधित करणार आहेत.

राज ठाकरे । PC: Twitter/Sandeep Deshpande

ठाण्यामध्ये 12 एप्रिल दिवशी मनसे कडून राज ठाकरेंच्या 'उत्तरसभे'चं आयोजन करण्यात आलं आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालिसा लावा या राज ठाकरेंच्या मनसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर राज्यात वातावरण पुन्हा ढवळून निघालं होतं राजकीय वर्तुळामध्येही चर्चा, टीकेचे बाण सुरू झाले आहेत. पण या सार्‍यावर राज ठाकरे पुन्हा भूमिका मांडणार आहेत. दरम्यान आता ते काय बोलणार याची उत्सुकता वाढली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)