Kalyan Marathi Family: मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या शुक्लावर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरेल; उल्हास भोईर यांचा इशारा
कल्याण येथे मराठी कुटुंबास अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केलेबद्दल समस्त मराठी जनांतून संताप व्यक्त होतो आहे. या प्रकरणात शुल्का नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल व्हावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष यांनी इशारा देत म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका इमारतीत किरकोळ वादातून, मराठी माणसांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या माणसाविरोधात कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी पुढे म्हटले आहे की, मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं आणि यापुढे जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठी उभी राहते तसं मराठी जनतेने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी उभं रहायला हवं.
मनसेच्या अधिकृत एक्स हँडलवरुन पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)