Sushant Singh Rajput Suicide Case: सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; आमदार नितेश राणे यांची मागणी
दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
Sushant Singh Rajput Suicide Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Raput) ची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज नागपूर विधानसभेत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात. दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. (हेही वाचा -Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी करणार चौकशी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)