Milind Deora Quits Congress: 'मी विकासाच्या मार्गावर जात आहे' कॉंग्रेसला सोडचिठ्ठीनंतर मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या मिलिंद देवरा यांनी आपण 'विकासाच्या मार्गावर जात आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मिलिंद देवरा हा राज्यातला आणि कॉंग्रेसच्या राजकारणामधील एक सुसंस्कृत चेहरा म्हणून पाहिला जात होता मात्र आज त्यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्र कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 55 वर्षांचे कॉंग्रेस सोबतचे बंध तोडून आज त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय ट्वीट करत शेअर केला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या मिलिंद देवरा यांनी आपण 'विकासाच्या मार्गावर जात आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी सिद्धिविनायकाचे प्रभादेवीच्या गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार मिलिंद देवरा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. Milind Deora Quits Congress: मिलिंद देवरा यांनी दिला कॉंग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा; 'शिवसेना' पक्षात आज करणार प्रवेश?
पहा ट्वीट
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचले देवरा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)