Maratha Reservation: फेब्रुवारी 2024 मध्ये मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येणार; मनोज जरंगे पाटील यांना सरकारवर विश्वास ठेवण्याची CM Eknath Shinde यांची विनंती
त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Maratha Reservation: राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यासह, आम्ही मनोज जरंगे पाटील यांना सरकारवर विश्वास ठेवण्याची जाहीर विनंती करतो. असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रत्येकाचे काम आहे. आपण जे करतोय ते सर्वांसमोर आहे. आम्ही सांगतो तेच करतो. आमचे सरकार संवेदनशील आहे. आमची भूमिका आणि हेतू स्पष्ट आहे. मनोज जरांगे आणि इतर आंदोलकांना माझे आवाहन आहे की, सरकारवर विश्वास ठेवा, या कामासाठी (मराठा आरक्षण) असून त्यासाठी थोडा वेळ लागेल. थोडा वेळ द्यावा.’ (हेही वाचा: Mobile Shop on e-Vehicle: राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत उपलब्ध होणार फिरत्या वाहनावरील दुकान; जाणून घ्या कुठे व कधी पर्यंत कराल अर्ज)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)