Manoj Jarange Patil Withdraws Hunger Strike: नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; विधानसभा निवडणुकीपर्यंत आरक्षण देण्याचा इशारा

मराठ्यांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात ओबीसी कोटा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

Manoj Jarange Patil | Twitter

Manoj Jarange Patil Withdraws Hunger Strike: मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी दुपारी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उपोषण मागे घेताना त्यांनी कार्य्क्रत्यांना सांगितले की, न्यायालयाने त्यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. आज सायंकाळी पाच वाजता ते उपोषण सोडणार असल्याची माहिती आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली होती. गेल्या आठ दिवसांत जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देत, उपोषण मागे घेण्याची विनंती करत अनेक मंत्र्यांनी मनोज यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली होती. गेल्या 17 सप्टेंबरपासून सुरू झालेले जरांगे यांचे हे सहावे उपोषण होते. मराठ्यांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात ओबीसी कोटा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. उपोषणाला स्थगिती देताना ते म्हणाले की, निवडणुकीपर्यंत जर आरक्षण दिल नाही तर सगळी निवडणूक बिघडवणार आहे, माझ्या स्वतःसाठी मी आंदोलने करीत नाही. (हेही वाचा: Internal Politics in BJP: अमित शाह यांच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्याकडे बोट; भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळली)

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित-