Man Jumped From Upper Floor Of Mantralaya: मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून व्यक्तीने मारली उडी; सुरक्षा जाळ्यात अडकला (Watch Video)

एका व्यक्तीने मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली आहे. मात्र त्यानंतर तो इमारतीत बसवलेल्या सुरक्षा जाळ्यात अडकला.

Man Jumped From Upper Floor Of Mantralaya: मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून व्यक्तीने मारली उडी; सुरक्षा जाळ्यात अडकला (Watch Video)
Man Jumped From Upper Floor Of Mantralaya

Man Jumped From Upper Floor Of Mantralaya: मुंबईमधील मंत्रालयामध्ये आधी अनेकवेळा आत्महत्येचे प्रयत्न झाले होते. आता आज पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली होती. मात्र त्यानंतर तो इमारतीत बसवलेल्या सुरक्षा जाळ्यात अडकला. या घटनेनंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब व्यक्तीला पोलिसांनी वाचवले. सध्या पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याआधी मार्च महिन्यातही एका व्यक्तीने असाच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. (हेही वाचा: World's Largest Stepwell: पुण्यात बांधली जात आहे जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहीर; तब्बल 500 वर्षानंतर होत आहे असा पहिला जलसंधारण प्रयत्न)

पहा व्हिडिओ- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2024 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).