Man Drinking Alcohol in Local Train: लोकल ट्रेनच्या डब्यातील मद्यपानाचा व्हिडिओ व्हायरल, मुंबई पोलिसांनी GRP ला दिले कारवाईचे आदेश

हा व्हिडिओ वडाळा रोड ते पनवेल स्टेशन दरम्यानचा आहे.

मुंबईकरांची जिवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकल ट्रेनमधला (Mumbai Local) एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस लोकल ट्रेन सामानाच्या डब्यात एक माणूस मद्यपान करताना दिसत आहे. ट्विटरवरुन S¥NDICATE नावाच्या एका वापरकर्त्यांने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओतील व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती लोकल ट्रेनच्या डब्यात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली बॉटलमधून दारु पीत आहे. हा व्हिडिओ वडाळा रोड ते पनवेल स्टेशन दरम्यानचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जीआरपीला (GRP) कारवाई करण्यास सांगितले आहे.

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)