Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 31 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाला असल्याने, मे महिन्यात पावसाचा 107 वर्षांचा जुना विक्रम मोडला जात आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो व रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि बाह्यतः मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Pune Rains: पुण्यात मे 2025 मध्ये गेल्या 50 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस; बारामती, इंदापूर, दौंडमध्ये पूरस्थिती, NDRF च्या दोन तुकड्या तैनात)

जाणून घ्या जिल्हानिहाय हवामान अंदाज-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement