Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 31 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाला असल्याने, मे महिन्यात पावसाचा 107 वर्षांचा जुना विक्रम मोडला जात आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो व रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि बाह्यतः मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Pune Rains: पुण्यात मे 2025 मध्ये गेल्या 50 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस; बारामती, इंदापूर, दौंडमध्ये पूरस्थिती, NDRF च्या दोन तुकड्या तैनात)
जाणून घ्या जिल्हानिहाय हवामान अंदाज-
उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी ४०-५० किमी वेगाने वारे आणि जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 27, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/47nJPkCW03
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 27, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 27, 2025 03:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

