Maharashtra Weather Update: येत्या दोन दिवसात कोकणात कोरडे हवामान, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

याकाळात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rain | (Photo Credit: Archived, edited, representative images)

येत्या दोन दिवसात कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. याकाळात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात तापमानाचा आकडा वाढलेला पाहायला मिळेल. किनारपट्टी भागातील तापमान 37 अंश किंवा त्यापेक्षाही अधिक असू असते असा अंदाजही वर्तवला आहे. (हेही वाचा: रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळभाज्या लावून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीने गावाला केलं प्रदुषणमुक्त; राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने गौरव)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement