Maharashtra Weather Update: येत्या 24 तासात विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
आता पुन्हा एकदा राज्यात येत्या 24 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज काही ठिकाणी थोडी विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात येत्या 24 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या 9 ऑगस्ट रोजी, पालघर, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र पुण्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. (हेही वाचा; Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज)
पहा पोस्ट-
#WeatherUpdate | राज्यात येत्या 24 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. pic.twitter.com/cHDzZfxs76
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 6, 2024
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2024 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

