Maharashtra Rain Update: आयएमडीकडून उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान पाहता सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम, आसाम आणि मेघालयमध्ये खूप मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. (हेही वाचा; Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज)
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी-