Maharashtra Politics: उद्धव ठाकरे करणार भाजपशी हातमिळवणी? Priyanka Chaturvedi यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या- 'अजून वेळ आहे, थोडे सुधारा'
शिवसेना (UBT) राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे भाजपशी हातमिळवणी करण्याच्या सर्व शक्यता आणि बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरेदेखील अनुपस्थित राहिले. त्यानंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करण्याचा विचार करू शकतात, असा दावा करण्यात येत आहे. याबाबत काही अहवालही समोर आले आहेत. आता उद्धव ठाकरे गटाकडून याबाबत स्पष्टीकरण समोर आले आहे. शिवसेना (UBT) राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे भाजपशी हातमिळवणी करण्याच्या सर्व शक्यता आणि बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करण्याची शक्यता वर्तवणाऱ्या एका पोस्टला प्रतिक्रिया देताना चतुर्वेदी म्हणाल्या, ‘भाजपच्या बीटशी संबंधित पत्रकारांचा एकच स्रोत आहे, तो म्हणजे पीएमओ. या पीएमओमध्ये बसलेले त्यांचे मीडिया सल्लागार भाजपचा अजेंडा चालवत आहेत! मला त्यांना सांगायचे आहे, अजून वेळ आहे, थोडे सुधारा! जनतेनेच तुमच्याकडून पसरवलेल्या सर्व खोट्या गोष्टी नाकारल्या आणि तुम्हाला बहुमतापासून दूर ठेवले!’ (हेही वाचा: Nana Patole: लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसला विधानसभेचे वेध! 150 जागा लढण्यासाठी चाचपणी, नाना पटोले यांचा दावाही चर्चेत; घ्या जाणून)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)