Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकार शिवसेनेचे मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात का झाले सामील? अखेर व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण
आठवडाभरापूर्वी महाविकास आघाडी सरकार मध्ये उभी फूट पडली आणि शिवसेना आमदार, अपक्ष आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले. दरम्यान विधानसभेतून मंत्री झालेले आणि शिंदे गटात सहभागी झालेले शेवटचे मंत्री उदय सामंत होते. सामंतांनी शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीला हजर लावून मग शिंदे गटात सहभाग घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आज त्यांनी याचं कारण सांगताना 'गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे.'असं म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले असा दावा देखील त्यांनी केला आहे.
उदय सामंत यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)