Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकार शिवसेनेचे मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात का झाले सामील? अखेर व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण

'गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून गुवाहाटीला आल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Political  Crisis: महाविकास आघाडी सरकार शिवसेनेचे मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात का झाले सामील? अखेर व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण
Uday Samant | (File Photo)

आठवडाभरापूर्वी महाविकास आघाडी सरकार मध्ये उभी फूट पडली आणि शिवसेना आमदार, अपक्ष  आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले. दरम्यान विधानसभेतून मंत्री झालेले आणि शिंदे गटात सहभागी झालेले शेवटचे मंत्री  उदय सामंत होते. सामंतांनी शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीला हजर लावून मग शिंदे गटात सहभाग घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आज त्यांनी याचं कारण सांगताना 'गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे.'असं म्हटलं आहे.  राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले असा दावा देखील त्यांनी केला आहे.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2022 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).