Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून विधानसभा बरखास्त न करण्याची शिफारस
यामध्ये तीनही पक्षांचे मंत्री उपस्थित होते.
महाराष्ट्रात राजकीय पेचप्रसंगादरम्यान महाविकास आघाडीचे सरकार जाण्याची शक्यता दिसत आहे. एवढेच नाही तर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी तर विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने जात आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. अशात आज सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामध्ये तीनही पक्षांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली नसल्याची माहिती मिळत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)