Maharashtra Political Crisis: 'आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल'; Narayan Rane यांचे वक्तव्य

आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, अशी धमकी नारायण राणे यांनी दिली आहे.

नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही घडत आहेत. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी तसेच राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी आज संध्याकाळी शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यानंतर आता नारायण राणे यांनी ट्वीट करत, आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, अशी धमकी दिली आहे. त्यांनी संजय राऊत यांना, ‘तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा,’ असा टोलाही लगावला आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करत, त्यांनी काढलेली शोभायात्रा हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे, असे म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement