Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये अपक्ष आमदारांची साथ; किशोर जोरगेवार आणि गीता जैनही पोहोचले गुवाहाटीला
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि गीता जैनही गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत
शिवसेनेविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये आणखी दोन नावे सामील झाली आहेत. महाराष्ट्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि गीता जैनही गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. यावरून जर हे आमदार शेवटपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले आणि शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांची साथ सोडली नाही, तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)