Case Filed Against Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध बीड मध्ये गुन्हा दाखल

Nandakumar Thakur, SP, Beed

Manoj Jarange Patil | Twitter

Manoj Jarange Patil यांच्याविरूद्ध बीड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सलाईनद्वारा विष देण्याचा कट असल्याचं' सांगत खळबळ पसरवली होती त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या 'सागर' बंगल्यावर आपण जाणार असल्याचं सांगत मोर्चा तेथे वळवला होता पण काल त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. बीड मध्ये त्यांच्यावर लोकांना अवैध पद्धतीने लोकांना चिथवल्याप्रकरणी आणि ट्राफिक जाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 341,143,145,149,188 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   Nandakumar Thakur, SP, Beed यांनी ही माहिती दिली आहे. Manoj Jarang Patil on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा 'बामणी कावा', हिंमत नसल्याने पोलिसांना पुढे करतात- मनोज जरांगे पाटील .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)