Maharashtra Monsoon 2022 Update: रायगड, चिपळूण ते कोल्हापूर मध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ; मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्याधिकार्यांना अलर्ट राहण्याचे निर्देश
चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस बरसत आहे. या बरसणार्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देण्याचे आदेश आहेत तसेच सार्या जिल्हाधिकार्यांना अलर्ट राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.