IPL Auction 2025 Live

Maharashtra MLC Election Results: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मारली बाजी; सर्व 9 उमेदवार विजयी

राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis (संग्रहित संपादित प्रतिमा)

Maharashtra MLC Election Results: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत सुमारे अर्धा डझन काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, ज्यामुळे महायुतीचे सर्व नऊ उमेदवार सहज विजयी झाले. तर महाविकास आघाडीला केवळ दोनच जागा मिळाल्या. काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव, तर उद्धव ठाकरे गटाचे मिलिंग नार्वेकर यांचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने नऊ उमेदवार उभे केले होते. निवडणूक सर्वांनी जिंकली.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत सर्व 274 आमदारांनी शुक्रवारी मतदान केले. राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी निर्धारित 4 वाजेपर्यंत सर्व 274 सदस्यांनी मतदान केले. तुरुंगात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर मतदान करण्यासाठी विधानभवनात पोहोचले होते. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, भावना गवळी आणि कृपाल तुमाने विजयी झाले आहेत. (हेही वाचा: PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर; रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे करणार उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)