IPL Auction 2025 Live

अनंत करमुसे हल्ला प्रकरणात राज्याचे गृहनिर्माण मंत्री Jitendra Awhad यांची जामिनावर सुटका

सिव्हिल इंजिनिअरवर कथित हल्ला केल्याच्या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज वर्तक नगर पोलिस स्टेशन मध्ये हजेरी लावली झाले.

Jitendra Awhad (Photo Credits: ANI)

सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज वर्तक नगर पोलिस स्टेशन मध्ये हजेरी लावली झाले. तेथे त्यांनी आपले स्टेटमेंट नोंदवले. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात त्यांची 10,000 रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर करमुसे यांना आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर नेत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी करमुसे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली होती. मात्र आव्हाड यांच्यावर तब्बल दीड वर्षांनी कारवाई करण्यात आली होती. परंतु, त्यांची जामिनावर सुटकाही झाली.

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)