Maharashtra Legislative Council Polls: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; 12 जुलै 2024 रोजी होणार मतदान

या निवडणुकीसाठी मंगळवार, 25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. मंगळवार, 2 जुलै, 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल.

Maharashtra Legislative Council Polls: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; 12 जुलै 2024 रोजी होणार मतदान
Election Voting प्रतिकात्मक प्रतिमा

Maharashtra Legislative Council Polls: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाळ 27 जुलै 2024 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार, 12 जुलै 2024 रोजी मतदान होणार आहे. विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणी, नीलय मधुकर नाईक, ॲड. अनिल दत्तात्रय परब, रमेश नारायण पाटील, रामराव बालाजीराव पाटील, डॉ.वजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉ.प्रज्ञा राजीव सातव, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे 27 जुलै 2024 रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत.

या निवडणुकीसाठी मंगळवार, 25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. मंगळवार, 2 जुलै, 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी बुधवार, 3 जुलै, 2024 रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, 5 जुलै, 2024 अशी आहे. शुक्रवार, 12 जुलै, 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी 5 वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 16 जुलै, 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (हेही वाचा: Shiv Sena Foundation Day 2024: मुंबईमध्ये उद्या जल्लोषात साजरा होणार शिवसेना स्थापना दिन; ठाकरे व शिंदे गटाकडून खास कार्यक्रमांचे आयोजन)

पहा पोस्ट- 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).