Maharashtra Kesari Bailgada Sharyat 2022: राज्यात 2 जून रोजी महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांना मिळणार 22 लाखांची बक्षिसे

राज्याच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असणार आहे

Bullock Cart Race (संग्रहित संपादित प्रतिमा)

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात 7 वर्षानंतर पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरु झाल्या आहेत. आता आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असणार आहे. याआधी रोहित पार यांनी, बैलगाडा शर्यत हा राज्याच्या ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुले 'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे'च्या धर्तीवर शासनामार्फत 'महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत' आयोजित करण्याची विनंती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांना केली होती. त्यानुसार 2 जून 2022 रोजी कर्जत येथे हा बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.