Maharashtra Kesari 2023 Winner: शिवराज राक्षे ठरला ६५व्या महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी, महेंद्र गायकवाडला चितपट करत मिळवला विजय
महेंद्र गायकवाड विरुध्द शिवराज राक्षे अशी चुरशीची लढत बघायला मिळाली.
Maharashtra Kesari 2023 Final: पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धाची अंतिम लढत पार पडली. यंदा महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) ठरला आहे. या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती आतापर्यन्त पाहायला मिळाल्या. दरम्यान, ‘महाराष्ट्र केसरी’ 2023 चा किताब शिवराज राक्षे याने पटकावला आहे. महेंद्र गायकवाड विरुध्द शिवराज राक्षे अशी चुरशीची लढत बघायला मिळाली. दोघांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच या अंतिम सामन्याला राज्यातील दिग्ग्ज नेत्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे आणि उपविजेत्या महेंद्र गायकवाड हे दोघंही मालामाल होणार आहेत. विजेता आणि उपविजेत्या अशा दोघांनाही बक्षिस देण्यात येणार आहे. केसरी गदा पटकावणाऱ्या शिवराजला रोख 5 लाख रुपये, आणि महिंद्रा थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)