Maharashtra Government Jobs: राज्यात 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती; आणखी 31,000 नियुक्ती पत्रे लवकरच जारी केली जाणार- Devendra Fadnavis
सरकारी नोकऱ्यांमध्ये एक विक्रम निर्माण झाला आहे. सरकारने 1 लाख पेक्षा जात नोकऱ्या दिल्या आहेत. 75,000 नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु आधीच 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती केली आहे.
Maharashtra Government Jobs: विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी फडणवीस म्हणतात, ‘आम्ही 70 लाख इच्छुकांच्या परीक्षा घेतल्या आहेत आणि पेपर फुटल्याचे एकही प्रकरण आढळले नाही. प्रवेश परीक्षेदरम्यान झालेल्या काही चुकीच्या बाबींच्या 47 एफआयआर आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये एक विक्रम निर्माण झाला आहे. आमच्या सरकारने 1 लाख पेक्षा जात नोकऱ्या दिल्या आहेत. आम्ही 75,000 नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु आम्ही आधीच 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती केली आहे आणि आणखी 31,000 नियुक्ती पत्रे लवकरच जारी केली जाणार आहेत.’ (हेही वाचा: Maharashtra Challan Update: चलान थेट बँक खात्यातून वसूल होणार? थकीत असलेले 2,429 कोटी वसूल करण्यासाठी राज्य सरकाची बँक खाते ई-चालानशी जोडण्याची केंद्राकडे मागणी)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)