Maharashtra Government Formation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
नुकतेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
नुकतेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहेत.
ते म्हणतात, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी श्री एकनाथ शिंदे यांचे यांचे अभिनंदन करतो. एकनाथ शिंदे हे तळागाळातील नेता आहेत. त्यांच्याकडे समृद्ध राजकीय, विधिमंडळ आणि प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. महाराष्ट्राला आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी ते काम करतील असा मला विश्वास आहे.'
यासह देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत ते म्हणतात, 'महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यांचा अनुभव आणि कौशल्य सरकारसाठी एक संपत्ती असेल. मला खात्री आहे की ते महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आणखी मजबूत करतील.'