Diwali 2022: महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळी पूर्वी मिळणार यंदाच्या महिन्याचा पगार; अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले आदेश

ऑक्टोबर 2022 चे नोव्हेंबरमध्ये अदा होणारे वेतन तातडीने दिवाळीपूर्वीच करण्याच्या सूचना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळी पूर्वी मिळणार यंदाच्या महिन्याचा पगार मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. शासन परिपत्रक जारी करत त्यांनी  ऑक्टोबर 2022 चे नोव्हेंबरमध्ये अदा होणारे वेतन तातडीने दिवाळीपूर्वीच करण्याच्या सूचना दिल्या असून तसा आदेश सुद्धा निर्गमित केला आहे. असे ट्वीट देखील करून सरकारी कर्मचार्‍यांना गोड बातमी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)