Insurance Coverage For Warkari: लाखो वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू

त्यांच्याद्वारा मोफत औषधोपचार दिले जातात.

Wari | Twitter

महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला पायी वारी करत येणार्‍या वारकर्‍यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विठ्ठल-रूक्मिणी वारकरी छत्र योजना लागू करत त्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता वारी मध्ये अपघात होणं, मृत्यू होणं अशा परिस्थितीत सरकार कडून मदतीचा हात मिळणार आहे. मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाखांची मदत मिळणार आहे. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देण्यात येतील. वारीत आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)