Maharashtra Dy CM Swearing-in Ceremony: एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात आता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी आज एनसीपी चे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महायुती सरकार चे नेतृत्त्व आता देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आले आहे. राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली आहे. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाले आहेत. आपल्या शपथेच्या वेळेस त्यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासह पीएम मोदी, अमित शाह आणि राज्यातील नागरिकांचा उल्लेख करत शपथ घेतली आहे. Ajit Pawar आज सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ; 4 मुख्यमंत्र्यांसोबत सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे ठरले एकमेव नेते!
अजित पवार आणि एकनाथ शिंदे नवे उपमुख्यमंत्री
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)