Maharashtra Dy CM Devendra Fadnavis on Violence: छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचारावर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; नेत्यांनाही शांतता राखण्याचं आवाहन

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचार हा दुर्देवी प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit -ANI)

जळगाव मध्ये दोन गटात तुफान राडेबाजी झाल्यानंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीचे काही प्रसंग घडले आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचार हा दुर्देवी प्रकार असल्याचं म्हटलं आहे. सोबतच लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.  फडणवीसांनी राजकीय मंडळींनाही आपल्या स्वार्थासाठी भडकाऊ विधानं न करण्याचे सूचित केले आहे. सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे तर हिंदू बांधव आज श्रीराम नवमी साजरी करत आहेत. नक्की वाचा: Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात राडा; जोरदार दगडफेक, जमावाने पोलीस वाहनांसह 13 गाड्या जाळल्या .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now