Maharashtra Political Crisis: एनसीपी फूटीनंतर Maharashtra Congress ची मुंबई मध्ये आज बैठक; विरोधी पक्ष नेत्याबाबत होणार चर्चा

काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेत आपली त्यांना या संघर्षाच्या काळात साथ असेल असं सांगण्यात आले आहे.

Nana Patole | (Photo Credit - ANI)

महाराष्ट्रामध्ये आता शिवसेना पाठोपाठ एनसीपी पक्षातही उभी फूट पडली आहे. अजित पवार आमदारांचा एक मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने विरोधीपक्ष नेतेपद आता कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज मुंबईत महाराष्ट्र कॉंग्रेसने बैठक बोलावली आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली ही बैठक होणार असून सध्याच्या राजकीय घडामोडींवरही त्यामध्ये चर्चा होणार आहे. अजित पवारांनी एनसीपी वर दावा केल्यानंतर सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस सभागृहामध्ये असणार आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद येणार आहे.  Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनंतर Nana Patole सह कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत घेतली शरद पवारांची भेट .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement