अयोद्धेत भगवान श्रीराम विराजमान झाले; Maharashtra CM Eknath Shinde यांनी ठाण्यात ढोल वाजवत साजरा केला आनंद (Watch Video)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये ढोल वाजवत आनंद साजरा केला आहे.

CM Shinde | Twitter

अयोद्धेमध्ये 5 दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मंदिरामध्ये भगवान श्रीराम विराजमान झाले आहेत. जगभरात रामभक्तांनी हा क्षण आज 'याचि देही याचि डोळा' पाहून मनात साठवून ठेवला आहे. या सोहळ्यानंतर अनेकांनी आनंद साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये ढोल वाजवत आनंद साजरा केला आहे. आज ते अयोद्धेमध्ये या सोहळ्याला हजर नव्हते. मात्र पुढील महिन्यात आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना घेऊन राम दर्शनाला जाणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now