Maharashtra CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threats: शरद पवार यांना आलेल्या धमकीची सरकारकडून गंभीर दखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार नोंदवली आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ANI)

शरद पवार यांना ट्वीटर द्वारा आलेल्या धमकीची सरकारकडून गंभीर दखल घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून तपासाच्या सूचना देण्यात आल्याचंही ते म्हणाले आहेत. देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवार यांच्याप्रति आपल्याला आदर आहे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. दरम्यान एनसीपी कडूनही या प्रकरणी रितसर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement