Maharashtra Cabinet Meeting: शासकीय आर्थिक व्यवहारासाठी राज्य सहकारी बँकेला परवानगी; मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासकीय आर्थिक व्यवहारासाठी राज्य सहकारी बँकेला परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शासकीय आर्थिक व्यवहारासाठी राज्य सहकारी बँकेला परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या सोबतच 16,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक नक्त मूल्य असलेल्या खाजगी बँकांना आणि 4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक नक्त मूल्य असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मंबईला शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहारांसाठी तसेच सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा: Nagpur: Devendra Fadnavis यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर Police आणि BJP च्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; पोलीस आयुक्तांनी केलं वृत्ताचं खंडन)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)