Maharashtra Cabinet Meeting Decision: आज पार पडली महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक; जाणून घ्या महत्वाचे निर्णय
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता.
आज 22 सप्टेंबर 2021 रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
-
-
-
- भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता. (नगर विकास विभाग)
- प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अल्पसंख्यांक उमेदवारांकरिता निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग योजना राबविणार. (अल्पसंख्यांक विकास विभाग)
- रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प पाचव्या सुधारीत प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
- महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये एकसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पध्दत. (नगर विकास विभाग)
- नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय. (नगर विकास विभाग)
- महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या विकासाची वाटचाल मांडण्यासाठी साखर संग्रहालय उभारणार. (सहकार विभाग)
- सहकारी सुतगिरणी आकृतीबंधातील मानव विकास कमी असणाऱ्या जिल्ह्याचा किंवा तालुक्यांचा समावेशाची अट रद्द करण्याचा निर्णय. (वस्त्रोद्योग विभाग)
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ६५ कलम ७५ व कलम ८१ मध्ये दुरुस्ती करण्यास मान्यता. (सहकार विभाग)
- कापूस पणन महासंघाद्वारे २०२०-२१ च्या हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी अतिरिक्त ६०० कोटींच्या कर्जास शासनहमी. (पणन विभाग)
- गाळप हंगाम २०२१-२२ करिता सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास शासन थकहमी देणार. (सहकार विभाग)
- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मध्ये सुधारणा. (ग्राम विकास विभाग)
-
-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय कारवाईत किमान 100 दहशतवादी ठार; Rajnath Singh यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement