Maharashtra Cabinet Meeting: औरंगाबादचे 'संभाजी नगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मंजुरी
औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यास मंजुरी
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यास मंजुरी दिली आहे. यासह नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलून डीबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. गेले अनेक महिने शिवसेनेकडून याबाबत मागणी होत होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)