Maharashtra Cabinet Expansion 2024: शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महायुती मध्ये शिवसेनेचे 57 विजयी उमेदवार आहेत.

Maharashtra Cabinet Expansion 2024: शिवसेनेकडून गुलाबराव पाटील,  दादा भुसे, संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Gulabrao Patil | X @ANI

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेना पक्षाचे 57 उमेदवार निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत  यांची पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्र्यांचं मूल्यांकन करून त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.  दरम्यान इच्छूकांची संख्या अधिक असल्याने काहींना अडीज वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. आज शिवसेनेच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.   Maharashtra Cabinet Expansion 2024 Live Streaming: महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video). 

शिवसेनेकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).