Maharashtra Cabinet Decisions: मुंबईतील गोरेगाव येथील म्हाडा वसाहतींचा होणार पुनर्विकास; 33 हजार गाळे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होऊ शकतील

आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले

CM Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook)

आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

यासह, मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास केल्यावर पुनर्वसन घटकाव्यतिरिक्त साधारणपणे 33,000 गाळे सर्वसामान्य नागरिकांसाठी  उपलब्ध होवू शकतील. त्यामुळे यास “विशेष प्रकल्पाचा दर्जा” देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement