Maharashtra Budget Session 2023: विधिमंडळाच्या आवारात विरोधकांचं 'भोपळा आंदोलन'; सामान्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद नसल्याचं सांगत आक्रमक

विरोधक विधिमंडळाच्या आवारात भोपळा घेऊन आंदोलन करताना दिसले.

Bhopla Aandolan | PC: Twitter/ANI

देवेंद्र फडणवीस यांनी काल (9 मार्च) राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाचा काल 'चुनावी जुलमा' असा उल्लेख करत विरोधकांनी उल्लेख करत या केवळ हवेत केलेल्या बाता म्हणत सामान्यांना यामधून काहीच मिळणार नसल्याचं सांगितलं होतं. आता आज त्यावर चर्चा होण्याची शक्यता असताना विरोधक विधिमंडळाच्या आवारात भोपळा घेऊन आंदोलन करताना दिसले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)