Maharashtra Board Exams 2024: नांदेड मध्ये 10वी, 12वी च्या परीक्षेत कॉपी होणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द होणार - जिल्हाधिकार्यांचे आदेश
जेथे कॉपीचे प्रकार आढळतील तेथे कारवाई होणार असून परीक्षा केंद्रांची थेट मान्यता रद्द केली जाईल. असे आदेश नांदेड जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
नांदेड मध्ये 10वी, 12वी च्या परीक्षेत कॉपी होणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याचे आदेश आज जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.21 फेब्रुवारी ते 19 मार्च बारावी तर 1 मार्च ते 26 मार्च दहावीची परीक्षा यंदा होणार आहे. ही परीक्षा भयमुक्त, कॉपी मुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये जेथे कॉपीचे प्रकार आढळतील तेथे कारवाई होणार असून परीक्षा केंद्रांची थेट मान्यता रद्द केली जाईल.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)