Maharashtra Assembly Monsoon Session: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून मुंबईत सुरु; 28 जून रोजी मांडला जाणार अतिरिक्त अर्थसंकल्प

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

Maharashtra Assembly Monsoon Session: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, 27 जून ते शुक्रवार, 12 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार 29 जून 2024 सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले. (हेही वाचा: अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची किंमत कमी केली: संघ मुखपत्रातून टीकास्त्र)

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement