Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जाहीर केली 15 उमेदवारांची तिसरी यादी; मुंबादेवी येथून Shaina NC यांना उमेदवारी
शिवसेनेच्या शिंदे गटाने आपल्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेचे 13 आणि मित्रपक्षांचे 2 उमेदवार आहेत.
Shivsena Candidate 3rd List: यंदाच्या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे सत्र सुरु आहे. शिवसेनेने (शिंदे गट) सोमवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. शिवसेनेच्या शिंदे गटाने आपल्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेचे 13 आणि मित्रपक्षांचे 2 उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने मुंबादेवी येथून शायना एनसी यांना उमेदवारी दिली आहे. शायना एनसी या भाजपच्या नेत्या आहेत, मात्र शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. याआधी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 20 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. या यादीत संजय निरुपम यांना दिंडोशी आणि मिलिंद देवरा यांना वरळीतून तिकीट देण्यात आले आहे. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा रिंगणात उतरणार आहेत. दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील चार जागांवर भाजपचे मित्रपक्ष निवडणूक लढवणार, यादी जाहीर)
शिवसेना एकनाथ शिंदे गट उमेदवारांची तिसरी यादी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)