IPL Auction 2025 Live

Maharashtra Assembly Election 2024: देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

पक्षाच्या नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहाव्यांदा तिकीट दिल्याबद्दल आभार मानले.

Devendra Fadnavis filed his nomination form (फोटो सौजन्य - X/@gsjadhav79)

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहाव्यांदा तिकीट दिल्याबद्दल आभार मानले. मला खात्री आहे की लोक मला आशीर्वाद देतील. महायुती सरकारने केलेल्या कामांमुळे आम्ही राज्यात पुन्हा सरकार स्थापन करू. आम्ही महाराष्ट्राला दिलेली गती कायम राखणे हेच आमचे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)