Mahaparinirvan Diwas: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी वाहिली आदरांजली (Video)

मुंबईमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

Dr. Babasaheb Ambedka | (Photo Credits: Wikipedia Commons)

Mahaparinirvan Diwas: आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवसाचे औचित्य साधत देशभरात बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. मुंबईमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेबांना नमन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झाले. त्यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला. (हेही वाचा: Mahaparinirvan Din Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status द्वारे अर्पण करा आदरांजली!)

69th Mahaparinirvan Diwas:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement