Mahaparinirvan Din 2022: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष गाड्या; जाणून घ्या सविस्तर

यातील 3 विशेष गाड्या नागपूरते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान चालवण्यात येतील.

रेल्वे (फोटो सौजन्य-फेसबुक)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन हा महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. दरवर्षी 6 डिसेंबर रोजी हा दिवस आयोजित केला जातो. आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी 6 डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने गर्दी करतात. आता महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

यातील 3 विशेष गाड्या नागपूरते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान चालवण्यात येतील. 6 गाड्या मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर येथे चालवण्यात येतील. 2 गाड्या कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान चालवल्या जातील. 2 गाड्या सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान आणि 1 विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान चालवली जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement