Andheri East Water Supply: अंधेरी पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा, मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु

मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अंधेरी पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल, अशी माहिती मुंबई महाालिकेने दिली आहे.

Andheri East Water Supply | (Photo Credit: X)

मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अंधेरी पूर्व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल, अशी माहिती मुंबई महाालिकेने दिली आहे. पालिकेच्या एक्स हँडलवर दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, अंधेरी पूर्व येथे वेरावली-३ सेवा जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम अविरत आणि अखंडपणे सुरु आहे, मात्र तांत्रिक आव्हानांमुळे त्यास अधिकचा कालावधी लागत आहे. सबब, आज रविवार, दिनांक ३ डिसेंबर २०२३ सायंकाळपर्यंत हे दुरुस्ती काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार झाल्यावर के पूर्व, के पश्चिम, एच पश्चिम, एन आणि एल विभागात पाणीपुरवठा केला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement